बार्शीटाकळी: तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी येथे भाविक भक्तांची नवरात्र निमित्त अलोट गर्दी पोलिसांचा चोख बंदोबस्त.
बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी येथे भाविक भक्तांची नवरात्र उत्सव निमित्ताने अलोट गर्दी पहावयास मिळत आहे. या गर्दीत कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी बार्शीटाकळी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला आहे. गेल्या एका आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पहावयास मिळत असून भक्तांकडून देवी मातीच्या चरणी वेगवेगळ्या मनोकामना आतापर्यंत पूर्ण झाल्याची ही आख्याईका काही भक्तांनी सांगितल्या आहेत.