आष्टी: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात येणार आमदार सुरेश धस यांचे आवाहन
Ashti, Beed | Sep 28, 2025 अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून आष्टी तालुक्यातील दहा मंडळे, आष्टा आणि आष्टी,पाटोदा तालुका तसेच शिरूर कासार तालुका अतिवृष्टीग्रस्त घोषित झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. असे आवाहन आष्टी पाटोदा शिरूर या मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी आवाहन केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे देखील त्यांनी म्हटले आहे