जालना: महापौरांची नोटीस नगरसेवक श्रीकांत पांगाकर यांनी पत्रकार परिषदेत फाडून केराच्या टोपलीत टाकली
Jalna, Jalna | Jul 23, 2026 जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वापरलेल्या कथित आक्षेपार्ह शब्दांप्रकरणी चार नगरसेवकांना बजावण्यात आलेल्या नोटीसवरून वाद अधिकच चिघळला आहे. या प्रकरणी नगरसेवक श्रीकांत पांगाकर यांनी पत्रकार परिषद घेत महापौरांनी दिलेली नोटीस फाडून केराच्या टोपलीत टाकत तीव्र निषेध नोंदविला. पत्रकार परिषदेत बोलताना श्रीकांत पांगाकर यांनी, "महापौरांना अशा प्रकारे नोटीस देण्याचा अधिकार नाही. मला बेकायदेशीर पद्धतीने नोटीस बजावण्यात आली आहे. कायद्याच्या चौकटीत आणि नियमानुसार नोटीस दिली असती तर तिचा मी स