पेण: महाड नगरपरिषद निवडणूक तापली!
तटकरे यांच्या उपस्थितीत सुदेश कळमकरांसह उमेदवारांचे नामांकन दाखल
Pen, Raigad | Nov 16, 2025 महाड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नामांकन प्रक्रियेला जोरदार सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी–भाजपा युतीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सुदेश कळमकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांनीही मोठ्या संख्येने नामांकनपत्रे सादर केली.