सातारा: वैद्यकीय अधिकारी आत्महत्येची उच्चस्तरी चौकशीची मागणी; शिवतीर्था समोर गुंडराज विरोधी संयुक्त मोर्चाची सह्यांची मोहीम
Satara, Satara | Oct 31, 2025 महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागात फलटण येथे कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी बेजबाबदार, गलथान आणि लाजिरवाण्या कारभाराची उच्चस्तरी चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी गुंडराज विरोधी संयुक्त मोर्चाच्या वतीने आज शुक्रवार, 31 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजल्यापासून साताऱ्यातील पोवई नाका शिवतीर्थसमोर सह्यमोहीम राबविण्यात आली.या मोहिमेमध्ये युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.