जालना: नशामुक्त व डीजेमुक्त समाजनिर्मिती हीच महापुरुषांना खरी आदरांजली-अनंत कुलकर्णी
Jalna, Jalna | May 10, 2026 महापुरुषांच्या जयंतीनिमित्त केवळ डीजे लावून त्यावर नाचणे म्हणजे उत्सव नव्हे, तर त्यांच्या विचारांचे अनुकरण करून नशामुक्त आणि सुसंस्कृत समाज घडवणे हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल, असे प्रतिपादन जालना उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी केले. हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव समितीच्यावतीने लोधी मोहल्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या जन्मोत्सव सोहळ्यात श्री. कुलकर्णी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. समितीचे संस्थापक मार्गदर्शक धनसिंह सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली