धुळे: हजार खोली कापड बाजारात किरकोळ वादातून मारहाण; तिघांवर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Nov 29, 2025 धुळेतील चाळीसगाव रोडवरील हजार खोली कापड बाजारात लहान मुलांच्या किरकोळ वादातून व्यापारी मोबीन अहमद अन्सारी व त्यांच्या मुलावर २७ नोव्हेंबरच्या रात्री जीवघेणा हल्ला झाला. पेरू चोरल्याची माहिती पालकांना दिल्याचा राग मनात धरून तिघांनी दोघांना शिवीगाळ करत मारहाण केली. यात दोघेही जखमी झाले असून, २८ नोव्हेंबर रोजी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय हरी पाटील करत आहेत.