भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अड्याळ हद्दीतील केसलवाडा येथे शेतशिवारात अवैधरित्या मोहफुल हातभट्टी दारू गाळप अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दि. २२ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी हातभट्टी दारू गाळप अड्ड्यांवर छापा घालून हातभट्टी उधळून लावली. पोलिसांनी किसनवाडा येथील आरोपी श्रीकांत गजभिये वय ४१ वर्षे यांच्या ताब्यातून १ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ८०० किलोग्रॅम सडवा मोहपास लोखंडी, ड्रम जलाऊ काड्या व विविध साहित्य जप्त केला आहे.