राळेगाव: राळेगाव महसूल विभागाची खैरी येथे धाडसी कारवाई अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर जप्त
वर्धा नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर रेती वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल विभागाने मोहीम उघडली असून अशातच महसूल विभागाच्या पथकानेर रेतीची अवैध वाहतूक प्रकरणी एक टिप्पर जप्त करून वडकी पोलीस ठाण्यात लावण्यात आला ही कारवाई दिनांक 6 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान खैरी येथे करण्यात आली या कारवाईमुळे वाळू माफी यांचे दाबे चांगलेच दणाणले आहे.