जालना: निसर्ग रक्षक मित्रांनी ठिपकेवाल्या घुबडाच्या पिलाला दिले जीवदान; स्वयंसेवकाचे सर्वत्र होतंय कौतुक
Jalna, Jalna | May 22, 2026 जालना येथील निसर्ग रक्षक प्राणी मित्र व पक्षी मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिपकेवाल्या घुबडाच्या पिलाला जीवदान देत त्याला सुखरूपपणे पुन्हा त्याच्या अधिवासात सोडले. शुक्रवार दि. 22 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या संवेदनशील कार्याबद्दल पर्यावरणप्रेमींकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. महिको सीड, दावलवाडी परिसरात एक घुबडाचे पिल्लू बेशुद्ध अवस्थेत पडले असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी नागरिकांनी महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना, मधुकर गायकवाड यांना मिळाले होती.