केज: खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत केज येथे शरद पवार गटाची बैठक संपन्न
Kaij, Beed | Oct 16, 2025 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने केज तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न..! आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) केज तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेतृत्व यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. ही बैठक येडेश्वरी साखर कारखाना, आनंदगाव (सा.) येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मा. खासदार बजरंग बप्पा सोनवणे, माजी आमदार अॅड. संगिता ताई ठोंबरे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, तसेच तालुकाध्यक्ष शंकर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न