पुणे शहर: वानवडी पोलिसांची कारवाई; एमडीसह इसम जेरबंद.
Pune City, Pune | Oct 19, 2025 वानवडी पोलिसांची कारवाई; एमडीसह इसम जेरबंद वानवडी पोलिसांनी मॅफेड्रॉन (एमडी) विक्री करणाऱ्या इसमाला रंगेहात पकडले. न्यू कमांड हॉस्पिटलजवळ सापळा रचून रोहन प्रकाश अंगारके (वय २२, रा. गुलटेकडी) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६.८० ग्रॅम मॅफेड्रॉन (किंमत ₹१.३६ लाख), चेतक ई-स्कूटर व मोबाईल असा एकूण ₹२.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वानवडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक करीत आहेत.