चंद्रपूर: आ. मुनगंटीवार यांनी नातीसोबत 'किलबिल' येथील निराधार चिमुकल्यांसह साजरी केली दिवाळी
अगदी सणासुदीलासुद्धा सामाजिक बांधिलकी जपण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. या दिवाळीतही आमदार मुनगंटीवार यांनी तो जपला, कुटुंबीयांसोबत सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देत त्यांनी चंद्रपूरच्या किलबिल प्राथमिक बालगृह आणि दत्तक योजना केंद्रात कुटुंबीय आणि विशेष म्हणजे नातीसह दिवाळी साजरी केली.दिवाळीनिमित्त आमदार मुनगंटीवार कुटुंबीयांनी दि २१ ऑक्टोबर ला ७ वाजता'किलबिल'मधील चिमुकल्यांशी संवाद साधत त्यांच्या आवडीनिवडी विचारल्या आणि उत्साहाने त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला.