अकोला : अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी निश्चित करण्यात आलेल्या आरक्षण प्रस्तावास राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. 11 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या सोडतीत अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाचे आरक्षण मंजूर झाले होते. मात्र नागरिकांचा मागासवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) प्रवर्गाची सोडत आयोगाने पुनश्च घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 17 नोव्हेंबर रोजी नवीन सोडत घेऊन आरक्षण आयोगाकडे पाठविण्यात आले. 18 नोव्हेंबर रोजी आयोगा