चोपडा: दोदवाडे गावात चक्कर येऊन बेशुद्ध वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू चोपडा ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Chopda, Jalgaon | Sep 20, 2025 चोपडा तालुक्यात दोदवाडे हे गाव आहे. या गावातील रहिवाशी दंगल सुका कोळी हे वृद्ध आपल्या घराच्या बाहेर जात होते. त्यांना अचानक चक्कर आले आणि ते जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे आणण्यात आले येथे त्यांना उलटी झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.