बार्शीटाकळी: बार्शीटाकळी तालुक्यातील जिल्हा परिषद 7 सर्कलचे आरक्षण जाहीर
बार्शीटाकळी तालुक्यातील सात जिल्हा परिषद सर्कलचे आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये कान्हेरी सरप हा नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव महिला, दगड पारवा, पिंजर आणि झोडगा हे सर्वसाधारण महिला, तर महान हे सर्वसाधारण राखीव करण्यात आले आहे. तसेच राजंदा नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव तर जाम वसु हा सर्वसाधारण ठेवण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या दोन जागा, सर्वसाधारण महिलांच्या तीन जागा तर सर्वसाधारण अशा दोन जागांचा समावेश आहे. ही माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली.