कराड: यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी खा. सुप्रिया सुळे यांचे अभिवादन; शासनाने चव्हाण साहेबांच्या विचारांना हरताळ फासला, केली टीका
Karad, Satara | Nov 25, 2025 महाराष्ट्राचे शिल्पकार आणि सुसंस्कृत राजकारणाचे जनक मानल्या जाणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या, महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी सकाळी नऊ वाजता कराड येथील स्मृतिस्थळी दाखल झाल्या. त्यांनी चव्हाण साहेबांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार बाळासाहेब पाटील तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.