उमरी: तळेगाव पुलावरून पाणी वाहत असल्याने नायगावकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद: तहसीलदार भगत
Umri, Nanded | Aug 28, 2025 आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी दोन च्या दरम्यान तळेगाव येथे येथील पुलावरून पाणी वाहत आहे उमरी तालुक्यातील चार ते पाच गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली तळेगाव बळेगाव इथल्या पुलावरून पाणी वाहत आहे नायगाव जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे वाहनधारकांनी या पुलावरून वाहतूक करू नये, तसा प्रयत्न केल्यास जीवघेणा प्रवास होऊ शकतो उमरी तालुक्याच्या तहसीलदार भगत मॅडम उमरी तालुक्यातील वाहनधारकांना आव्हान करत म्हणाल्या