हदगाव: महावितरण कंपनी मनाठा येथे 40 हजार किंमतीचे विद्युत उपयोगी साहित्य अज्ञात चोरट्याने केले लंपास; मनाठा पोलिसात गुन्हा दाखल
Hadgaon, Nanded | Nov 25, 2025 महावितरण कंपनी मनाठा तालुका हादगाव जिल्हा नांदेड येथे दि 1 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी आठ ते दि 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी दहाच्या दरम्यान विद्युत उपयोगी साहित्य किमती 40 हजार रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी फिर्यादी भिसे व्यवसाय नोकरी वरिष्ठ तंत्रज्ञान ३३ केव्ही उपकेंद्र मनाठा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन मनाठा येथे आज दुपारी गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गिरी हे आज करीत आहेत.