समुद्रपूर: सिंचनासाठी दिवसाला १२ तास ३ फेज व रात्री १ फेज वीजचे शेतकऱ्यांची मागणी:गिरड येथील अभियंत्यांना दिले निवेदन
समुद्रपूर: यंदाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनचे पीक हातातून गेले असून, कापसाचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची सर्व आशा रब्बी हंगामातील चना, गहू, ज्वारी, तुर या पिकांवर आहे. या पिकांच्या सिंचनासाठी आवश्यक वीजपुरवठा नियमित मिळावा,यासाठी शेतकऱ्यांनी गिरड येथील विद्युत महावितरण कंपनीचे अभियंता विनोद खांडरे यांना निवेदन दिले आहे.