समुद्रपूर: स्थानाकडे:मगन संग्रहालय समितीचा उपक्रम
समुद्रपूर तालुक्यातील फरीदपूर गावाने आरोग्यदायी परिवर्तनाची नवी गाथा रचली आहे. मगन संग्रहालय समिती, सहाय्यक ट्रस्ट व ग्रामपंचायत फरीदपूर यांच्या संयुक्त प्रयत्नांतून तीन वर्षे चाललेल्या “अॅनेमिया मुक्त ग्राम” मोहिमेला अखेर यश मिळाले असून गावाला “अॅनेमिया मुक्त” घोषित करण्यात आले आहे.अशी मागणी मगन संग्रहालाचे समन्वयक गजानन गारघाटे यांनी दिली आहे.स्त्री आरोग्य सशक्त झाल्यास समाजाचे आरोग्य दृढ होते, या विचारातून 2022 मध्ये मोहिमेची सुरुवात झाली होती.