खालापूर: बिहार निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल खोपोली शहरात भाजपतर्फे मोठा जल्लोष
बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांना मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल खोपोली शहरात भारतीय जनता पक्षातर्फे मोठा जल्लोष शुक्रवारी साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि एकमेकांना मिठाई वाटून विजयाचा आनंद व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीचे खोपोली शहर निवडणूक प्रमुख यशवंत सावळे यांच्या नेतृत्वाखाली हा विजयोत्सव साजरा करण्यात आला.