जालना: गांजा विक्रेती महिला अटकेत; गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांचा छापा; जालना एलसीबीची धडक कारवाई, 78 हजारांचा गांजा जप्त#
Jalna, Jalna | May 14, 2026 जालना शहरात अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून स्थानिक गुन्हे शाखेने गांजा विक्री करणार्या एका महिलेला अटक केली आहे. गुरुवार दि. 14 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत तब्बल 3 किलो 806 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे 78 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. जुना जालना परिसरातील कैकाडी मोहल्ल्यात एक महिला गुप्तपणे गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.