भंडारा: जिल्ह्यात विजेच्या कडकटाटासह पावसाची शक्यता; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये येत्या तीन तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात, भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी भंडारा अभिषेक नामदास यांनी केले आहे. आज, १६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता प्रसारित झालेल्या माहितीनुसार, भंडारा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.