पेण: मंत्रालयात रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट परिसरातील पाणीटंचाईसंदर्भात बैठक
Pen, Raigad | Oct 14, 2025 रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट गाव आणि परिसरात तातडीने क्षेत्रीय पातळीवर पाहणी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आज मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत दिले. मंत्रालयात रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट परिसरातील पाणीटंचाईसंदर्भात झालेल्या बैठकीस आमदार रवीशेठ पाटील, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जल जीवन मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई. रवींद्रन, सहसचिव गीता कुलकर्णी, तसेच मुख्य अभियंता प्रशांत भामरे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.