जालना: जे. एस. कॉलेज परिसरामध्ये असलेल्या प्रणांगणात पार पडला मुक्ताई पालखी व रिंगण सोहळा
Jalna, Jalna | Jul 5, 2026 आज दिनांक 5 जुलै 2026 वार रविवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जालना शहरातील जे एस कॉलेज परिसरामध्ये असलेल्या प्रणांगणात मुक्ताई पालखी सोहळा व रिंगण सोहळा मोठ्या उत्सवात पार पडला आहे, या रिंगण सोहळ्याला व पालखी सोहळ्याला जालना शहरासह परिसरातील हजारो भाविक भक्तांनी उपस्थिती लावली होती याप्रसंगी टाळ मृदंगाच्या गजरात हा पालखी सोहळा मोठा उत्सवात पार पडला आहे यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सुद्धा तगडा पोलीस बंदोबस्त तयार केला होता.