ठाणे: अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, कोट्यावधीच्या आम्ही पदार्थांसोबत दोन आरोपींना घेतले ताब्यात
Thane, Thane | Nov 29, 2025 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सचिन चव्हाण आणि रवी त्यागुन नावाच्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 999.2ग्रॅम वजनाचा एमडी हा अमली पदार्थ जप्त केला आहे. त्याची एकूण किंमत एक कोटी 92 हजार इतकी आहे. त्यांनी हा अमली पदार्थ कोठून आणला होता कोणाला विक्री करणार होते या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.