अकोल्यातील खदान पोलीसांनी जबरी चोरीच्या प्रकरणात अवघ्या सहा तासात आरोपीला अटक करत मोठी कारवाई केली आहे. ५ डिसेंबर रोजी गौरक्षण रोड परिसरात फिर्यादीवर मिरची पावडर फेकून १ लाख २० हजार रुपये लुटण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी अनमोल पिंजरकर (रा. नाशिक) याला अटक केली. आरोपीकडून चोरी केलेली रक्कम, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोबाईल असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.