जिंतूर: बोरी गावाजवळ नायरा पेट्रोल पंपाजवळ लोडिंग ऑटो पलटी ; तीन जण जखमी
जिंतूर–परभणी महामार्गावर बोरी गावाजवळ नायरा पेट्रोल पंपाजवळ झालेल्या अपघातात एक लोडिंग ऑटो पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र चालक आणि दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना आज रविवार 2 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. अपघातानंतर उपस्थित ग्रामस्थांनी तत्परता दाखवत जखमींना परभणी येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.