पनवेल: आगरी दर्पणची सन २०२६ सालाची दिनदर्शिका लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशित
Panvel, Raigad | Dec 19, 2025 अखिल आगरी समाज परिषदेचे मुखपत्र असलेल्या आणि लोकनेते दि. बा. पाटील यांनी संस्थापक म्हणून वारसा लाभलेल्या 'आगरी दर्पण'ची सन २०२६ सालाची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते शुक्रवारी या दिनदर्शिकेचे मोठ्या उत्साहात प्रकाशन झाले. अखिल आगरी समाज परिषदेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न आणि संस्कृती जपण्याचे काम 'आगरी दर्पण' सातत्याने करत आहे.