अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रस्त्यावर आज मध्यरात्री पूर्ववैमनस्यातून दोन गटात राडा झाला. यात विनोद धोंडीराम कांबळे (वय ३२, बालिकाश्रम रस्ता) हा युवक गंभीर जखमी झाल्याचे समजते. या राड्यात एका चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. जखमी युवकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्या वादातून ही घटना झाल्याची माहिती आहे.