भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाने ठाणे महानगरपालिका निवडणुकीत वेगळा लढून दाखवावं. आम्ही त्यांना चॅलेंज करतो. हे वेगळे लढले तर आम्ही त्यांचे पानिपत करू. भाजपा शिवसेना शिंदे गटाची लढाई कोणाला जास्त जागा मिळणार यासाठी आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली आहे.