नागपूर ग्रामीण: शिवसेनेत ३०० कामगारांचा प्रवेश; नितीन तिवारींच्या नेतृत्वात संघटनेची ताकद वाढली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवत, युवा नेते नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात भांडेवाडी येथील ‘जिग्मा एनवायरॉन सॉल्यूशन’मधील सुमारे ३०० कामगारांनी आज शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.यावेळी नितीन तिवारी म्हणाले की, “शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून ती गोरगरीब, कामगार आणि उपेक्षितांचा आवाज आहे.