चंद्रपूर: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी यांनी दिली निदर्शने
राज्य सरकारी व निमशासकीय कर्मचारी विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, चंद्रपूरच्या वतीने आज, दि. 11 नोव्हेंबर ला चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 2 वाजता निदर्शने देण्यात आली. सरकारने प्रलंबित मागण्यांबाबत दखल घ्यावी, चंद्रपूर जिल्ह्यातील "एकस्तर पदोन्नती व प्रोत्साहन भत्ता" पुर्ववत सुरू राहण्याकरीता शासनाने सुधारीत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे यासाठी सरकारकडे लक्ष वेधले.