धारणी: शेत शिवारातील इलेक्ट्रिक केबल स्टार्टर व शेती साहित्याची चोरी, धारणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
धारणी शेत शिवारातून कुण्या तरी अज्ञात इसमाने शेतातील विहिरीवरील इलेक्ट्रिक केबल 290 फूट, इलेक्ट्रिक स्टार्टर व स्प्रिंकलरचे नोझल अशाप्रकारे शेतीपयोगी साहित्य चोरून नेल्याची घटना 10 ऑक्टोंबर ला चार वाजताचे दरम्यान उघडकीस आली असून याबाबतीत हुकुमचंद नंदूसा मालवीय यांनी 17 ऑक्टोंबर ला रात्री नऊ वाजून 49 मिनिटांनी धारणी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दाखल तक्रारीवरून धारणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे...m