अकोला : शहरातील बाजारपेठेसह विविध ठिकाणी कचऱ्याचे व बंदी असलेल्या प्लास्टिक पन्न्यांचे ढीग पडलेले असून त्यात अन्न शोधताना प्राणी प्लास्टिक गिळत असल्याचे दृश्य दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता दिसले. या प्रकारामुळे प्लास्टिक बंदी मोहिमेचे फक्त कागदावर अस्तित्व असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. स्वच्छता विभागाने तातडीने कारवाई करून शहरातील स्वच्छतेची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.