हिंगोली: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणावर नरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
हिंगोली तालुक्यातील नरसी पोलीस ठाणे अंतर्गत एका गावात घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीस हाताला धरून बाहेर नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाविरुद्ध नरसी पोलीस ठाण्यात दिनांक 7 ऑक्टोबर रोजी रात्री कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तरुणाच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. अशी माहिती आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता प्राप्त झाली आहे.