मुंबई: पत्रकार निखिल वागळेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई मराठी पत्रकार संघासमोर मुंबईतील विविध पत्रकार संघटना व पत्रकारांची निदर्शने
Mumbai, Mumbai City | Feb 13, 2024
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांच्या समवेत निर्भय बनोच्या सभेला जात असताना निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला झालं होता. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघासमोर मुंबईतील विविध पत्रकार संघटना व पत्रकारांनी निदर्शने केली. भाजपच्या गुंडांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर अर्ध्या तासात चारवेळा पाठलाग करून दगड, लाठ्या-काठ्या, हॉकी स्टिक, लोखंडी रॉडच्या साह्याने प्राणघातक हल्ला चढवला, असा आरोप महाराष्ट्रातील प्रमुख पत्रकार संघटनांनी केला आहे.