तापी नदीकाठावरून वाळू घेऊन गावाकडे परत येत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात पिंपरीनांदू (ता. मुक्ताईनगर) येथील एका २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता पिंपरीनांदू शिवारात घडली. यावेळी शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.