ठाणे: लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला तोंड द्यावे लागते, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेले बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Thane, Thane | Sep 26, 2025 आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार सुरेश म्हात्रे, खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. बैठकीदरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक वाहतूककोंडीवरून आक्रमक झालेले पाहायला मिळाले. लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सर्व सामान्य जनतेला तोंड द्यावे लागते अस सरनाईक म्हणाले आहे.