नगर पालिका निवडणूकीत प्रभाग क्र.२ मधुन उमेदवारी डावलून डॉ. योगेश क्षीरसागर यांनी माझ्या सारख्या सर्व सामान्य कुटूंबातील मराठा समाजाच्या मुलावर जाणिवपुर्वक अन्याय केला आहे. पाच दिवसांपुर्वी भाजपात आलेल्या आणि सर्व सुत्रे स्वतःच्या हाती घेतली. अशा योगेश क्षीरसागरांनी मला उमेदवारी देण्यापासून वंचित ठेवले. विशेष म्हणजे राणे साहेबांनी माझ्या उमेदवारी विषयी त्यांना विनंती करूनही उमेदवारी डावलली. प्रत्येकवेळी स्वार्थ पाहणारे आणि मराठा समाजावर अन्याय करणारे डॉ. योगेश क्षीरसागर आहेत.