गस्त घालत असताना गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाला एकाकडे 7 ग्रॅम 99 मिलीग्रॅम वजनाचा 'एमडी' ड्रग्ज नावाचा अंमली पदार्थ सापडल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पाषाणकर बाग परिसरात बुधवारी (ता.19) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे.