बदनापूर: गेवराई परिसरात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी
Badnapur, Jalna | Sep 24, 2025 आज दिनांक 24 सप्टेंबर 2025 वार बुधवार रोजी सकाळी 9:30 वाजता बदनापूर तालुक्यातील गेवराई येथे अतिवृष्टीने नुकसान झालेले शेती पिकांची पाहणी केली आहे, कारण मागील काही दिवसापासून जालना जिल्ह्यात व बदनापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, या पावसामुळे शेतकऱ्यांची खरीपत पेरलेली कपाशी, तूर ,सोयाबीन मका या पिकांचे नुकसान झाले आहे, या पिकांचे पावसाने मोठ नुकसान झाले असून या नुकसानीचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पाहणी करत पंचनामेचे आदेश महसूल विभागाला दिले .