प्रभागातील विकास कामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी उद्योजक बाबुशेठ नागरगोजे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा करण्यात आली शिवसेनेबाबत कोणतीही नाराजी नसून आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांमुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास असल्याचे बैठकीत सांगितले स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्याशी असलेल्या कौटुंबिक स्नेहसंमेलनचा उल्लेख करत नागरगोजे यांनी आगामी काळात प्रभागाच्या सर्व प्रश्नांवर काम करणार आहे