अचलपूर: येसुर्णा येथे दारू पकडणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ व धमकी; दारू विक्रेत्यास अटक
तालुक्यातील येसुर्णा येथे अवैध दारूविक्रीविरोधात कारवाईदरम्यान पोलिसांना शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना घडली. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक सूरज सुसतकर हे येसुर्णा गावात अवैध देशी दारू विक्रीविरोधात कारवाईस गेले होते. पोलिसांची चाहूल लागताच जमीर खा सुलतान खा पठाण (२७) हा घरात पळाला. उपनिरीक्षक सुसतकर यांनी त्याला बाहेर बोलावले असता, त्याने जोरजोरात शिवीगाळ करून “आम्ही तुम्हाला जिवाचे बरेवाईट करून फसवतो” अशी धमकी दिली. त्यावेळी सोबत असलेल्या मह