रोहा: रोहा येथे रायगड जिल्हा ज्वेलर्स असोसिएशन तर्फे खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार
Roha, Raigad | Oct 31, 2025 गेल्या काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये पार पडलेल्या ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’ या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे यांचं अत्यंत प्रतिष्ठित असा ‘भारत भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या सन्मानाचे औचित्य साधून आज शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास रोहा येथे रायगड जिल्हा ज्वेलर्स असोसिएशन तर्फे खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संबोधित करताना, “हा सत्कार मला भविष्यातील वाटचालीसाठी बळ देणारा ठरेल. त्यामुळे ज्वेलर्स असोसिएशनमधील सर्व व्यापारी मित्रांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. आजवर नेहमीच व्यापारी वर्ग आणि रोहेकरांचा आशीर्वाद माझ्यासोबत राहिला आहे. जेव्हा मी पहिल्यांदा जिल्हा परिषद अध्यक्ष झालो होतो, तेव्हाही जैन समाजाने माझा असाच सत्कार केला होता.