सकाळीच देव दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेला दुचाकीवरून येणाऱ्या दोन चोरट्यांनी मंगळसूत्र केलेल्या पास
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 2, 2025
आज दिनांक 2 नोव्हेंबर सकाळी 5 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये पहाटे आरतीसाठी जाणाऱ्या महिलेला चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मनी गंठण, मंगळसूत्र आणि कानातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावले. या दरम्यान त्यांनी महिलेला मारहाण करत जमिनीवर ढकलले असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.