चंद्रपूर: जिल्ह्यातील बल्लारपूर येथे
सिलेंडर स्फोटामुळे तीन घराचे नुकसान
कुटुंबांना आ.मुनगंटीवार यांच्यातर्फे भांड्यांचे किट
जिल्ह्यातील बल्लारपूर येथे झालेल्या गॅस सिलेंडर स्फोटामुळे तीन घरांचे आणि दैनंदिन वापरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले, हा अत्यंत दुर्दैवी प्रसंग आहे. या घटनेची माहिती माजी नगरसेविका सारिका कनकम यांनी दिल्यानंतर, चंद्रपूर येथील आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज दि 21 ऑक्टोबर ला 12 वाजता तिन्ही कुटुंबांना जीवनोपयोगी भांड्यांचे किट आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले