उत्तर सोलापूर: मोहोळ तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान: अनिल पाटलांची मुख्यमंत्र्यासह अन्य नेत्यांकडे तातडीने मदतीची मागणी
मोहोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि सीना नदीचा पूर यामुळे मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे मका, सोयाबीन, उडीद इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीला धक्का बसला असून अनेक शेतकरी दिवाळीच्या सणासमयीसुद्धा अन्नपाणी आणि आवश्यक वस्तू खरेदी करण्यात असमर्थ झाले आहेत. शिरापूरचे अनिल पाटील यांनी सचिन मुळीक यांच्याशी संपर्क साधून पाहणी केली असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी आदेश द्यावे अशी विनंती मंगळवारी सायं 5 वाजता पत्रकारांशी बोलताना केली आहे.