औसा -दिवाळीचा सण उजळताना औसा तालुक्यातील भादा गावात दुर्दैवी घटना घडली. गावाच्या शेतशिवारात विजेचा शॉक लागून एक शेळी आणि एक बोकड ठार झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शेतात धावती वीज गेल्याने तारांमधून स्पार्क होत होता. यादरम्यान शेळी आणि बोकड चरायला गेले असताना विजेच्या तारेच्या संपर्कात आले. क्षणातच दोघांचा मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात येताच ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.